जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढतच आहे दहा दिवसांपूर्वी ६०८ वर असलेली टॅंकरची संख्या या आठवड्याच्या सुरुवातीला ६७० वर पोहोचली आहे .गेल्या दहा दिवसात ६२ नवे टँकर जिल्ह्यात सुरू करावे लागले. दररोज किमान दहा ते पंधरा नवीन टँकर मागणीचे प्रस्ताव दाखल होत आहेत. या वेगाने टॅंकरची संख्या वाढली तर यंदा विक्रमी लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असून सर्वाधिक टँकर गंगापूर तालुक्यात 131 टँकर सुरू आहेत. त्या खालोखाल वैजापूर १२२, सिल्लोड १२९, औरंगाबाद ९८, पैठण ९०, फुलंब्री ४५, कन्नड ३५, तालुक्यात टँकरची संख्या सर्वाधिक आहे. आता नव्याने खुलताबाद तालुक्यातील मागणीचे प्रस्ताव दाखल होत आहेत. टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळाल्याने प्रस्ताव मंजुरीचा कालावधी कमी झाला आहे. त्यामुळे किमान आठ दिवसात गावांना टँकर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. तरीही जिल्ह्यात अजूनही किमान १५ गावे अन २३ वाड्याना टँकर पुरविणे आवश्यक आहे. सध्या ४८८ गावांना ६७० टॅंकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. तर १८९ वाड्या टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पाणी टँकर साठी ३५१ विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.